यवतमाळमध्ये मोदी विरोधी फलक लागल्याने खळबळ !

मुंबई नगरी टीम

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर असताना काँग्रेसने त्यांचे स्वागत विरोधी फलकांनी केले.मोदी परत जा असे लिहिलेले फलक सर्वत्र लावले होते. गेल्या वेळी मोदी प्रचारासाठी आले असताना चाय पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मोदींनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. पण ती पूर्ण न केल्याने हे फलक लावल्याचे सांगण्यात येते.

मोदींनी आज विविध विकासकामांचे उद्घाटन केले. मात्र ठिकठिकाणी त्यांच्याविरोधी फलकांनी स्वागत केले. फलक काढून टाकण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली होती.यवतमाळ हा सर्वाधिक संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा असून शेतकऱ्यांची अवस्था जास्त बिकट आहे.मोदींनी प्रचार करताना कर्जमाफीसह पिकाला हमीभाव वगैरे अनेक आश्वासने दिली होती. यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोदींविरोधात प्रचंड असंतोष आहे.

Previous articleभाजपने पालघरची जागा शिवसनेनेला सोडली  ?
Next articleविजयसिंह मोहिते पाटलांना करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारी ?