मुंबई नगरी टीम
मुंबई : कालपर्यंत सेना- भाजप वेगवेगळे लढण्याची भाषा करत होते परंतु राज्यात आणि देशात पराभवाच्या भीतीने सेना भाजपची युती झाल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
सेना – भाजपच्या आज झालेल्या युतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.आज शिवसेना भाजप एकत्र आले असले तरी राज्यातील जनता यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. हे दोन एकत्र आल्यानंतर सरकारविरोधी मतदानामध्ये विभाजन होणार नाही. १९९८ मध्ये सेना – भाजप सत्तेत असताना कॉंग्रेसच्या आघाडीला ३८ जागांवर लोकांनी निवडून दिले होते. तीच परिस्थिती आज राज्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तीच परिस्थिती येणार आहे असेही मलिक म्हणाले.