अभिनेत्री आसावरी जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज काँग्रेस पक्षात  प्रवेश केला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत त्यांना हा पक्ष प्रवेश केला. शिल्पा शिंदेनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी आसावरी जोशी ही दुसरी मराठी अभिनेत्री आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत  आसावरी जोशी  यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिग बॉसच्या दहाव्या पर्वाची विजेती शिल्पा शिंदे हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.आसावरी जोशी या चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून गाजल्या आहेत. ऑफिस ऑफिस ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. शाहरूख अभिनित ओम शांती ओममधील लव्हली कपूरची भूमिका त्यांनी केली होती.आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या असल्या तरी त्यांना काँग्रेस लोकसभेला तिकीट देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसला त्यांच्या लोकप्रियतेचा नक्कीच फायदा होऊ शकतो. यंदा काँग्रेसकडे उमेदवारी मागणार्यांची कमालीची गर्दी आहे. त्यामुळे अचानक प्रवेश केलेल्या अभिनेत्रींना तिकीट द्यायचे की निष्ठावानांना,हा प्रश्न काँग्रेससमोर आहे. मात्र निवडून येण्याची क्षमता हा निकष लावला तर तिकीट कुणालाही मिळू शकते. अभिनेत्री नगमा हिने अगोदरच उत्तर पश्चिम मुंबईसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

आसावरी जोशी म्हणाल्या की माझ्यासाठी हे क्षेत्र नवीन आहे. मी समाजसेवेसाठी राजकारणात आलेली आहे. काँग्रेस हा सर्वधर्म समभाव असणारा पक्ष आहे, एक वैचारिक व सुरक्षित पार्टी आहे. काँग्रेस पक्षाने संधी दिली तर लोकसभा लढविण्यासाठी मी उत्सुक आहे, परंतु संपूर्ण निर्णय हा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा असेल, ते जी जबाबदारी मला देतील ती मी स्वीकारायला तयार आहे.

Previous articleपराभवाच्या भीतीनेच सेना  भाजपची युती : नवाब मलिक
Next articleशिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी