शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

मुंबई नगरी टीम

मुंबई :लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाने हातमिळवणी केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून चार सतत एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेनेने भाजपाशी युती केल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तर बॅनरबाजी करत ‘आम्ही सत्तेला लाथ मारु’ अशा वाक्यालाच आदरांजली वाहिली आहे.

शिवसेनेने भाजपाशी युतीची घोषणा करताच समाजमाध्यामंवर शिवसेनेला ट्रोल करण्यात आले. नेटक-यांनी गेल्या साडे चार वर्षातील या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केलेले आरोप, टीका फोटोसह शेअर केले आहेत.तर सत्तेला लाथ मारु या वाक्यांची आठवण करुन देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘आम्ही सत्तेला लाथ मारू’ या वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. शिवसेना भवन आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत.

Previous articleअभिनेत्री आसावरी जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Next articleशिवसेनेवर नितेश राणेंचे ट्विट अस्त्र