५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्च रोजी मतदान

५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्च रोजी मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विविध २४ जिल्ह्यांमधील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

 सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल २०१९ ते जून २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी ११ मार्च २०१९ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १३ मार्च २०१९ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ ३ पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २५ मार्च २०१९ रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- ३, रायगड- २०, रत्नागिरी- ११, सिंधुदुर्ग- ४, नाशिक- ४८, धुळे- १८, जळगाव- १२, अहमदगनर- ३, नंदुरबार- ५, पुणे- २०, सोलापूर- ८, सातारा- ४४, कोल्हापूर- ३, औरंगाबाद- ३, उस्मानाबाद- २, परभणी- १, अमरावती- १, अकोला- १४, वाशीम- ३२, बुलडाणा- २, नागपूर- २, वर्धा- २९८, चंद्रपूर- १ आणि गडचिरोली- २. एकूण- ५५७.

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- १, रायगड- १५, सिंधुदुर्ग- ३, नाशिक- ४, धुळे- १, जळगाव- २, अहमदगनर- ४, नंदुरबार- १, पुणे- ३, सोलापूर- ३, सातारा- ६, सांगली- २, कोल्हापूर- ८, बीड- १, नांदेड- ६, उस्मानाबाद- २, परभणी- २, अकोला- ३, यवतमाळ- १, वाशीम- ६, बुलडाणा- २, नागपूर- ६. एकूण- ८२.

Previous articleभाजप आणि शिवसेना यांची युती मातोश्रीच्या स्वार्थासाठी
Next articleयाला म्हणतात सत्तेसाठी नंगानाच : नितेश राणे