साता-यात उदयनराजे भोसलेंच्या विरोधात नरेंद्र पाटील ?

साता-यात उदयनराजे भोसलेंच्या विरोधात नरेंद्र पाटील ?

मुंबई नगरी टीम

सातारा : खासदार उदयनराजे यांच्या विरोधात भाजपने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. सातार्यात माथाडी कामगारांची संख्या मोठी असल्याने पाटील यांना फायदा होऊ शकतो,असे भाजपचे आडाखे आहेत.२०१४च्या निवडणुकीत हा मतदारसंघ युती असल्याने शिवसेनेकडे आला. पण शिवसेनेने ही जागा रिपाईसाठी सोडली होती. पण आता ही जागा भाजपकडे आली आहे कारण रिपाई भाजपसोबत आहे.

त्यामुळे भाजप या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेने मान्य केल्यास भाजप नरेंद्र पाटील यांना उदयनराजे यांच्याविरोधात उभे करण्याच्या विचारात आहे.नरेंद्र पाटील अण्णासाहेब आर्थिक मागास मंडळावर अध्यक्ष आहेत.तर उदयनराजे यांचा सातार्यात भरपूर दबदबा आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.मात्र ते सर्वाशी फटकून वागत असल्याने त्यांच्यावर राग असणारे भरपूर असल्याचे बोलले जाते.त्यामुळे उदयनराजे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांचे मेतकूट जमले आहे. उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.मात्र जिंकण्याची खात्री असलेल्यांना तिकीट देण्याचे पवारांनी ठरवले आहे. त्यामुळे उदयनराजे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फारशी नाही.

Previous articleभाजप शिवसेना युतीने दलितांचा अपमान केला : रामदास आठवले
Next articleराज ठाकरे पुढील आठवड्यात निर्णय घेणार