..असे म्हणताना यांची जीभ कशी झडत नाही : अजित पवार
मुंबई नगरी टीम
पुणे : सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी चुकीची आणि अर्धवट माहिती दिल्याने कर्जमाफी रखडली,असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने कर्जमाफी देता आली नाही,असे म्हणताना यांची जीभ कशी झडत नाही,असे ट्विट केले आहे.
सरकारला असे स्पष्टीकरण देताना जीभ कशी झडत नाही,असे विचारताना पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे सुचले नाही का,असा सवाल केला आहे.जबाबदारी झटकता आणि शेतकरी सहकार्य करत नाही, म्हणता.सरकारने अनुदान थकवले आहे. याची सरकारने जरा तरी शरम बाळगावी,असा जोरदार टोला अजित पवारांनी लगावला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सहा हजार बावन्न कोटी रूपये मिळालेले नाहीत. मात्र सरकारने रक्कम रखडण्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडले आहे. यामुळे अजित पवारांनी सरकारला धारेवर धरले आहे.कर्जमाफी हा विषय निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.सरकार रखडलेल्या कर्जमाफीमुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे अजित पवारांनी या विषयावर सरकारला झोडून काढले आहे.