आधी लोकसभा जिंकू,मग विधानसभेबद्दल बोलू

आधी लोकसभा जिंकू,मग विधानसभेबद्दल बोलू

मुंबई नगरी टीम

इंदापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात इंदापूरमध्ये नेहमीच संघर्ष असतो. आजही याचा प्रत्यय आला.लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभा उमेदवारीचा निर्णय झाला तरच लोकसभा निवडणुकीत काम करू,असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी सुनावले होते. त्यांना आज राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले.

आधी लोकसभा जिंकायची आहे.इंदापूर विधानसभेचा प्रश्न आलाच कुठे?असा सवाल त्यांनी केला.आम्ही लोकसभेच्या ४८जागांबाबत चर्चा करत आहोत.इंदापूर मतदारसंघ हा काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा आहे.आणि राष्ट्रवादीशी काँग्रेसचे जमत नाही. त्यामुळे आधी इंदापूर विधानसभा जागेचा निर्णय घ्या,मग आघाडीच्या उमेदवाराचे काम करू,असा पवित्रा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावर राष्ट्रवादी काय भूमिका घेते,याची उत्सुकता होती. अजित पवारांनी त्यांना हे उत्तर दिले.

इंदापूर काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे असे आहे की,लोकसभेला आम्ही नेहमी आघाडीचे काम करतो.पण विधानसभेला नेहमीच आमचा घात केला जातो.लोकसभेपूर्वी विधानसभेबाबत निर्णय घ्यावा,अन्यथा आम्ही आघाडीचे काम करणार नाही,अशी.भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर घेतली होती.काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील या कुरकुरीमुळे विरोधी पक्षांना फायदा होणार नसला तरीही उमेदवाराचे मताधिक्य घटू शकते.

 

Previous articleआमदार बाळू धानोरकर करणार शिवसेनेला जय महाराष्ट्र
Next articleदानवे खोतकर वादात सुभाष देशमुख यांची मध्यस्थी