‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहा’
मुंबई नगरी टीम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे येत्या शनिवारी म्हणजेच ९ मार्चला रंग शारदा मध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे मोठी राजकीय घोषणा करण्याची शक्यता आहे.’राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा’ असे लिहिलेले पोस्टर्स सध्या ,समाज माद्यमांवर व्हायरल झाले आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेल्या एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली, तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमका कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या शनिवारी, नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत्या पार्श्वभूमीवर ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.काही दिवसापासुन मनसे राष्ट्रवादीसोबत महाघाडीत येणार असल्याची चर्चा आहे. मनसेला यासंदर्भात राष्ट्रवादीने हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी यांनीही आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत’ असे म्हटले होते. आता राज ठाकरे कोणता राजकीय सर्जिकल स्ट्राईक करणार याचे उत्त्र येत्या शनिवारी मिळेल.
















