निवडणुकीत जिंकू असा विश्वास शरद पवारांना नसेल

निवडणुकीत जिंकू असा विश्वास शरद पवारांना नसेल

मुंबई नगरी टीम

नागपूर: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी माढ्यातून आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर हा मुद्दा गाजताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शरद पवारांवर त्यांच्या माघारीबद्दल निशाणा साधला आहे. पवारांना निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास नसावा,म्हणून त्यांनी माघार घेतली असावी,असा टोला त्यांनी लगावला.

नवीन पिढीला संधी देण्याच्या निर्णयामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.यावरूनच नितीन गडकरी यांनी हा टोला मारला आहे. ते म्हणाले की,शरद पवार यांना माढा मतदारसंघातून निवडणूक जिंकू असा विश्वास नसेल किंवा सध्या राज्यसभेची मुदत असल्यामुळे त्यांनी माघार घेतली असावी.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत विदर्भातील सर्व दहाच्या दहा जागा जिंकू,.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.एअर स्ट्राईकचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही,असे त्यांनी सांगितले।गडकरी यांनी पवारांवर तोफ डागण्यामागे राष्ट्रवादीचा विश्वास डळमळीत करण्याचा हेतू आहे.पवारांनी माघार घेतल्याने पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वास कमी झाला आहे, अशी चर्चा आहे.

 

 

Previous articleपेंग्विन गोंजारण्यापेक्षा खरे जीव वाचवा : नितेश राणे
Next articleराजीव सातव यांची निवडणूक रिंगणातून माघार?