अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

मुंबई नगरी टीम

मुंबई:  अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असून,उत्तर प्रदेशातील गाझियाबाद लोकसभा मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

अभिनेता संजय दत्त यांनी १० वर्षापूर्वी अमर सिंह यांच्या आग्रहामुळे समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.  त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा  केली होती. मात्र त्यांनी  त्यावेळी निवडणूक लढवली नाही. दत्त कुटुंबीय हे काँग्रेसचे एकनिष्ठ समजले जाते. संजय दत्त यांची बहिण प्रिंया दत्त यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. सध्या अमरसिंह सपामध्ये नसले तरी संजय दत्त पुन्हा  निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. केंद्रीयमंत्री व्ही.के. सिंह यांच्या विरोधात त्यांना गाझियाबादमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

Previous articleभाजप शिवसेनेच्या असंवेदनशीलतेचा कळस
Next articleकाँग्रेस-राष्ट्रवादी नक्कीच पडणार