काँग्रेस-राष्ट्रवादी नक्कीच पडणार
मुंबई नगरी टीम
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडीवर टीकास्त्र सोडलो आहे. हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं असल्याने ते नक्कीच पडणार’, अशी टीका त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवत जनतेला त्याचा सुगंध देणे ही आपली जबाबदारी आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले .
औरंगाबाद येथे आज शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे मंत्री पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली. या दोन पक्षांनी आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते येत्या निवडणुकीत नक्कीच पडणार आहेत. आमच्या दोन पक्षाची युती ही फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवून जनतेला त्याचा सुगंध देणे ही आपली जबाबदारी आहे असेही ते म्हणाले ‘भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.