संजय निरूपम यांना अध्यक्षपदावरून हटवले

संजय निरूपम यांना अध्यक्षपदावरून हटवले
मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : मुबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना लोकसभा उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मात्र सोडावे लागणार आहे. निरूपम यांना उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याजागी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मिलिंद देवरा यांची नेमणूक करण्यात आली.

एकतर निवडणूक लढा किंवा पदावरुन पायउतार व्हा, असे निरुपमांना आदेश होते. त्यानुसार त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.आता मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील.

संजय निरुपम हे वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. मुंबई काँग्रेसचे एकनाथ गायकवाड,भाई जगताप,जनार्दन चांदूरकर आदी नेत्यांशी निरूपम यांचे पटत नाही.त्यांच्याविषयी अनेक तक्रारी हायकमांडकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही,याबाबतही साशंकता होती. अखेर दोनपैकी एक पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.विशेष म्हणजे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही निरुपमांना उमेदवारी देण्यास उत्सुक नव्हते,असे समजते.मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टींनी त्यांच्यावर मात केली होती. अखेर यावेळी निरुपमांना मतदारसंघ बदलून देण्यात आला आहे.यावेळी निरुपमांचा सामना शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्याशी होईल.काँग्रेसने आपल्या कोट्यातील जवळपास सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. फक्त पुण्याच्या जागेबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.

Previous articleकाँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून लढणार
Next articleराष्ट्रवादीच्या “त्या” नगरसेवकांचे निलंबन अखेर मागे