ठाकरे सरकार मधील “या” कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण

मुंबई नगरी टीम

मुंबई : ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण,धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे.खुद्द मंत्री शेख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ठाकरे सरकार मधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनामुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल व्हावे लागले होते. या तिन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या करोनाची कोणती लक्षणे नसून, स्वत:चे विलगीकरण केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी कोरोनाची चाचणी करण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचे काम सुरु ठेवणार आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे

Previous articleदरेकरांचा पवारांना सवाल : मग मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी साकडे का घातले !
Next articleराज्यातील ५ हजार महाविद्यालयीन तरुणी होणार “सायबर सखी”