ठाकरे सरकार अडचणीत ! एकनाथ शिंदेकडे शिवसेनेचे ३७ तर ९ अपक्ष आमदार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणा-या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच असून,कृषीमंत्री दादा भुसे,पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील आमदार दिपक केसरकर, संजय राठोड यांच्यासह मंगेश कुडाळकर यांनी शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या ३७ आमदारांसह ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याने शिंदे यांना समर्थन देणा-या आमदारांची संख्या आता ४६ वर पोहचली आहे.

गुवाहटीच्या मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांच्या संख्येत प्रत्येक दिवसात वाढ होत असल्याने शिवसेनेपुढील अडचणीत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल पर्यंत बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांना साथ देणा-या आमदारांच्या संख्येत वाढच होत आहे.काल कृषीमंत्री दादा भुसे,पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील,आमदार दिपक केसरकर, संजय राठोड यांच्यासह मंगेश कुडाळकर यांनी शिंदे यांची भेट घेवून त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.राजेद्र यड्रावकर,चंद्रकांत पाटील आणि गीता जैन यांनीही शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते.

३७ शिवसेना आमदार

एकनाथ शिंदे,अनिल बाबर,शभूराज देसाई,महेश शिंदे,शहाजी पाटील,महेंद्र थोरवे,भरत गोगावले,महेंद्र दळवी,प्रकाश अबिटकर,बालाजी किणीकर,ज्ञानराज चौगुले,रमेश बोरनारे,तानाजी सावंत,संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार,प्रकाश सुर्वे,बालाजी कल्याणकर,संजय शिरसाठ,प्रदीप जयस्वाल,संजय रायमुलकर,संजय गायकवाड,विश्वनाथ भोईर,शांताराम मोरे,श्रीनिवास वनगा,किशोर पाटील,सुहास कांदे,चिमणआबा पाटील,मंगेश कुडाळकर,लता सोनावणे,प्रताप सरनाईक,यामिनी जाधव,योगेश कदम,गुलाबराव पाटील,सदा सरवणकर,दीपक केसरकर,दादा भुसे,संजय राठोड

९ अपक्ष आमदार

बच्चू कडू,राजकुमार पटेल,राजेद्र यड्रावकर,चंद्रकांत पाटील,नरेंद्र भोंडेकर,किशोर जोरगेवार मंजुळा गावित,विनोद अग्रवाल,गीता जैन

Previous articleएकनाथ शिंदेकडे नेमके आमदार किती ? अखेर खरी माहिती आली समोर
Next articleबंडखोर आमदाराची खदखद : गेली अडीच वर्षे शिवसेना आमदारांसाठी वर्षाची दारं बंद होती