रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचा भाजपामध्ये प्रवेश
मुंबई नगरी टीम
मुंबई : सातारा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यांना माढातुन उमेदवारी दिली जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती
आमचा संघर्ष थेट बारामातीकरांशी असून समानतेची वागणूक मिळाली नाही, याचे शल्य वाटते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास करताना तुमचा पक्ष कोणता, हा प्रश्न कधीच विचारला नाही असे यावेळी रणजितसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे साता-यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
गरिबांना आपले वाटतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या देशाला लाभले आहेत. गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक निधी आपल्या सरकारने पश्चिम महाराष्ट्राला दिला आहे आणि असे करताना कुठल्याही भागावर अन्याय होऊ दिला नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.दोन्ही रणजितसिंहांचे पाण्याचे स्वन पूर्ण केल्याशिवाय आपले सरकार थांबणार नाही. आपल्याला मराठवाड्याला सुद्धा पाणी द्यायचे आहे. आज तरुण पिढी भाजपाकडे वळते आहे. देशाला उज्वल भविष्य निश्चित आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.माढाची जागा आपणच जिंकणार.पवार यांचा निर्णय म्हणजे ॲक्सिडेंटपेक्षा यू-टर्न बरा असा आहे. आता आयपीएल असो की वर्ल्ड कप, सगळ्या स्पर्धा आपणच असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.