तर… सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार !

तर… सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार !
मुंबई ‌नगरी टीम
मुंबईः ईशान्य मुंबईतून भाजप खासदार किरीट सोमय्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचे तीव्र विरोध केला आहे. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी तर किरीट सोमय्या यांना तिकीट मिळाले तर मी स्वत: त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असा इशारा दिला आहे.

निवडणूक अपक्ष लढवायची की शिवसेनेतून याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असेही राऊत म्हणाले.त्यामुळे सोमय्यांच्या अडचणी वाढल्या आहेतकिरीट सोमय्या यांना शिवसैनिकांचा प्रचंड विरोध आहे. शिवसेनाच नव्हे तर स्वकीयांकडूनही किरीट सोमय्यांना विरोध आहे,असा दावा राऊत यांनी केला.सोमय्या यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली तर भाजपला ही सीट गमवावी लागेल,असे ते म्हणाले.

राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केली.ज्यांनी आमच्या मंदिरावर टीका केली त्याला निवडून कसे आणणार? धनुष्य बाण आणि कमळासाठी काम करु,पण सोमय्यांसाठी करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.वेळ आलीच तर गुढी पाडव्याला उमेदवारी अर्ज भरणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना भेट नाकारण्यात आली.

Previous articleमहाराष्ट्रासाठी ३ लाख शाईच्या बाटल्या
Next articleमी चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना घाबरत नाही