युती किंवा आघाडीची चिंता करू नका,शिवसेना बळकटीसाठी कामाला लागा

मुंबई नगरी टीम

मुंबई । दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा शिवसेना भाजप एकत्रित येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला असतानाच,युती किंवा आघाडीची चिंता करू नका,शिवसेनेच्या बळकटीसाठी कामाला लागा असे आदेश आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना केले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक आज पार पडली.या बैठकीला शिवसेना पक्षप्रपमख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.त्यांनी यावेळी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना बळकट करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले.या बैठकीत सर्व गावागावात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. हे शिवसंपर्क अभियान येत्या १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार असून, तसेच जनतेची कामे करा,पक्ष बळकट करा, असे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले.शिवसंपर्क अभियानात विधानसभानिहाय,तालुकानिहाय आणि पंचायतनिहाय कामे करण्यात येणार आहे.गावांमध्ये पोहोचत लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.तसेच राज्य सरकारकडून राबविण्यात येणा-या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत का ? याची खातरजमा करा अशा सूचनाही ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना यावेळी केल्या.

Previous articleभाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग : जयंत पाटील यांचा आरोप
Next articleजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकला : ऊर्जामंत्र्यांची मागणी