वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती होणार; मात्र वंचित महाविकास आघाडीचा भाग असणार का ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.युतीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे.ही युती फक्त शिवसेना वंचित बहुजन आघाडीची असेल की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असेल हे शिवसेनेने स्पष्ट केल्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) युती संदर्भात चर्चा सुरु असून, वंचित बहुजन आघाडीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे.युतीबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यासह काही खासदार यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकीत युती संगर्भात सकारात्मक चर्चा झाली.तसेच युती करण्याबाबत सुभाष देसाई यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली.या दोन नेत्यामध्येही युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनून चार पक्षांची आघाडी करून निवडणूका लढविणार की,शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे शिवसेनेने स्पष्ट केल्यावर पुढच्या टप्प्याची चर्चा सुरू होणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Previous articleभविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Next article७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय