गजानन कीर्तिकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा-रिपाइं (ए)-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर हे उद्या मंगळवारी ९ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना ते मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार,विभागप्रमुख व आमदार अनिल परब,राज्यमंत्री रविंद्र वायकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर,विभागप्रमुख व आमदार सुनिल प्रभु,भाजपाचे आमदार अमित साटम, आमदार भारती लव्हेकर, रिपाइं (ए)चे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, शिवसेना महिला विभाग संघटिका राजुल पटेल, साधना माने,भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सरीता राजपुरे, रासपचे जिल्हाध्यक्ष मनिष पटेल आदी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. किर्तीकर यांच्या प्रचार रथफेरीस काल रविवार पासून सुरूवात झाली. जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील प्रभाग क्र. ५२ मधील गोरेगाव पूर्व येथील साईबाबा कॉम्प्लेक्स,गोकुळधाम, ओबेरॉय टॉवर्स या परिसरातील जनतेचा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांचे जोरदार स्वागत केले.या प्रचार फेरीत गजानन कीर्तिकर यांचेसमवेत विभागप्रमुख व आमदार सुनिल प्रभु, भाजपाच्या नगरसेविका प्रिती सातम, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, शाखाप्रमुख संदीप गाढवे,काशिनाथ परब यांचेसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.