पंकजा मुंडेंना डावललं! प्रवीण दरेकर,राम शिंदे,प्रसाद लाड,श्रीकांत भारतीय,उमा खापरेंना उमेदवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानपरिषदेसाठी भाजपने पुन्हा एकदा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा यांना उमेदवारी नाकारली आहे.त्यांच्या ऐवजी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी दिली आहे.विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे,प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

येत्या २० जून रोजी होणा-या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड,श्रीकांत भारतीय आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर,राज्यसभा निवडणुकीला डावललेल्या माजी मंत्री आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र त्यांना संधी मिळालेली नाही.प्रविण दरेकर,प्रसाद लाड,राम शिंदे या जुन्या नेत्यांना उमेदवारी देतानाच भाजपने श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Previous articleराज्यसभा निवडणूक : ११ अपक्षांसह सीपीआयचे आमदार महाविकास आघाडीच्या गळाला
Next articleराजीनामा देवूनही नसीम खान यांचा पत्ता कट;भाई जगताप,चंद्रकांत हंडोरेंना संधी