जातीच्या आधारावर मते मिळणार नाहीत हे शरद पवार यांना आता कळू लागलंय
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणूकीत आता जातीच्या आधारावर मते मिळणार नाहीत हे कळायला लागल्यानंतर जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असावे, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज लगावला
तावडे म्हणाले की, जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. पण पवार यांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यानंतर लोकांना माहित असते, त्यामागे त्यांचे म्हणणे काय आहे. पण शिरूर चा उमेदवार देतांना काय विचार केला होता. मातीचा केला होता का जातीचा केला होता, असा सवालही त्यांनी यावेळी केला.अजित पवार यांनी आता पर्यंतच्या निवडणुकांमध्य़े साम दाम दंड भेद याचाच वापर केला. गेल्या खेपेस लोकसभा निवडणुकीत त्यांची क्लिप वायरल झाली होती, त्यात ते काय बोलले होते ते त्यांनी जरा आठवून बघावे, विनाकारण दुस-यांवर आरोप करू नये, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.