माता- भागिनींच्या आशीर्वादामुळे राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित

माता- भागिनींच्या आशीर्वादामुळे राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित

 मुंबई नगरी टीम

मुंबई : ” पाच वर्षे केलेली विकासकामे आणि माता- भगिनींचा आशीर्वाद, यांच्या जोरावर राहुल शेवाळे हे पुन्हा एकदा विजयी होतील” अशा शब्दांत शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी शेवळेंच्या विजयाचे भाकीत केले. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या चेंबूर येथील प्राचारफेरीत बांदेकरांनी हा विश्वास व्यक्त केला. तसेच विकासकामांच्या जोरावर, महाराष्ट्रात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असेही बांदेकर म्हणाले.

महाराष्ट्रातील माता- भगिनींचे लाडके भावोजी आदेश बांदेकर हे महायुतीचे  उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारफेरीत सामील झाले. चेंबूर पूर्वेच्या शिवसेना शाखा क्रमांक १५२ पासून या प्रचारफेरीला सुरुवात झाली. प्रचार रथावर स्वार होत बांदेकर यांनी राहुल शेवाळे यांना विजयी करण्याचं आवाहन चेंबूरमधील जनतेला केलं.  चेंबूर नाक्यावरील शाखेतून सुरू झालेली ही प्रचारफेरी डायमंड गार्डन, चेंबूर चर्च आणि इथल्या परिसरात संध्याकाळी उशिरापर्यंत फिरत होती. यावेळी माता- भगिनींनी आपल्या लाडक्या भावोजींना आणि राहुल शेवाळे यांना ओवाळले. तर वरिष्ठांनी आशीर्वाद दिले. या प्रचारफेरीला आदेश बांदेकर, राहुल शेवाळे यांच्यासोबत शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार प्रकाश फतर्फेकर, नगरसेविका सुप्रदा फातर्फेकर, आशा मराठे, शांताताई नलावडे, सौ. कामिनी राहुल शेवाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, शाखाप्रमुख शेखर चव्हाण आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleडॉ. श्रीकांत शिंदे यांना  वाढता पाठिंबा
Next articleगजाभाऊंना विजयी करून  मोदींचे हात बळकट करा