आपल्या फिटनेससोबतच देशाच्या फिटनेसची काळजी घ्या

आपल्या फिटनेससोबतच देशाच्या फिटनेसची काळजी घ्या

मुंबई नगरी टीम

मुंबई : दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज (गुरूवार) पहाटे माटुंग्याच्या फाईव्ह गार्डन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मुंबईकरांची भेट घेतली. “स्वतः च्या फिटनेससोबतच देशाच्या फिटनेसची देखील काळजी घ्या आणि मतदान जरूर करा” अशा शब्दांत शेवाळे यांनी या मॉर्निंग वॉकर्सना आवाहन केले. यावेळी नगरसेवक अमेय घोले, निहाल शहा, माजी शाखाप्रमुख संदीप चिवटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे गुरूवारी सकाळी साडे सातच्या दरम्यान माटुंग्याच्या फाईव्ह गार्डन येथे आले. यावेळी त्यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या आणि व्यायाम करणाऱ्या मुंबईकरांची भेट घेतली. स्थानिक नागरिकांनी उस्फूर्तपणे जागोजागी शेवाळे यांचा शाल- श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.अनेक नागरिकांनी शेवाळे यांच्या विजयाबद्दल दृढ विश्वास व्यक्त केला. स्मार्ट उमेदवार राहुल शेवाळे यांनी पहाटे केलेल्या या मतदान जागृतीची चर्चा या परिसरात रंगली होती.

Previous articleआदित्य ठाकरेंनी ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद
Next articleपराभवाच्या भीतीनेच विरोधकांकडून जातीचे राजकारण