एसटीच्या वर्ग १ व २ अधिकारीपदाची  लेखी परीक्षा १७ ,१८,१९ मे रोजी

एसटीच्या वर्ग १ व २ अधिकारीपदाची  लेखी परीक्षा १७ ,१८,१९ मे रोजी

मुंबई नगरी टीम

मुंबई :  एसटीच्या विविध वर्ग १ व २ अधिकारी पदासाठी  ऑनलाइन परीक्षा १७ ,१८, १९ मे रोजी होणार असून या परीक्षेला ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत , त्या पात्र उमेदवारांची परीक्षेचीचे प्रवेशपत्रे एसटी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्यासंबंधीचा लघुसंदेश त्यांनी (उमेदवार)अर्जामध्ये नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर व भ्रमणध्वनी वर (मोबाईलफोन) पाठवून देण्यात आलेले आहेत.

 उमेदवारांनी प्रवेशपत्र www.msrtcexam.in या संकेतस्थळावरून  प्राप्त करून घ्यावेत.तसेच उमेदवारांनी परीक्षेच्या केंद्रावर किमान दिड तास अगोदर हजर रहावे.  सदर परिक्षा on-line पध्दतीने घेण्यात येणार असून, १०० प्रश्नांच्या या परिक्षेत प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील. परिक्षेचा कालावधी दीड तास  असणार आहे. अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे.ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र अजुनी प्राप्त झालेले नाहीत , तसेच काही शंका असल्यास 18005722005 या निःशुल्क दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा. तसेच उमेदवारांनी कोणत्याही  अवैध प्रलोभन अथवा अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे परिक्षा दयावी,असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleलोकसभा निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?
Next articleराज ठाकरे यांची पत्राद्वारे बळीराजाला साद !