मनोज कोटक की संजय पाटील बाजी मारणार ?  

मनोज कोटक की संजय पाटील बाजी मारणार ?  

मुंबई नगरी टीम

मुंबई : उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपाचे विद्यमान खासदार  किरीट सोमय्या यांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेमुळे आयत्या वेळी उमेदवारीची माळ गळ्यात पडलेले मनोज कोटक की राष्ट्रवादीचे संजय पाटील येथून खासदार होणार याचा फैसला परवा २३ मे रोजी होणार असला तरी येथिल वातावरण पाहता हि जागा भाजप राखू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनेने किरिट सोमय्या यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता. जर  सोमय्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात निवडणुक लढविण्याता इशारा सेनेच्या आमदाराने दिला होता. त्यामुळे येथून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली तरी कार्यकर्त्यांची मने जुळली नसल्याचे चित्र प्रचारावेळी दिसत होते. मात्र या ठिकाणचा स्थानिक मतदार हा भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथून भाजपाचे मनोज कोटक विजयी होतील असा दावा भाजपच्यावतीने केला जात आहे.

राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी येथिल मराठी मतदारांची मने जिंकल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिनसेनेतील असणा-या वादाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला मात्र त्याचा किती फायदा त्यांना होईल हे  आता २३ तारखेलाच स्पष्ट होईल.

ईशान्य लोकसभा मतदारसंघात यंदा  ५७.१५ टक्के मतदान झाले त्यात मुलुंडमध्ये ६३.६६ टक्के, मानखुर्द शिवाजी नगरमध्ये ४७.०८ टक्के, विक्रोळीमध्ये ५७.३० टक्के ,भांडूप पश्चिममध्ये ५८.८८ टक्के, घाटकोपर पश्चिममध्ये ५५.८९ टक्के,घाटकोपर पूर्वमध्ये ६१.२७ टक्के मतदान झाले आहे

२०१४ मध्ये मिळालेली मते

१ ) किरिट सोमय्या – भाजप – ५२५२८५

२ ) संजय पाटील    – राष्ट्रवादी- २०८१६३

Previous articleडब्‍बेवाल्यांची शाळा प्रवेश बंदी उठणार ?
Next articleअरविंद सावंत गड राखणार !