सिल्व्हर ओक हल्ल्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई । सिल्व्हर ओक हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवले होते तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. जास्तीचा बंदोबस्त ठेवायला हवा होता तेवढा ठेवला गेला नाही असे स्पष्ट करतानाच आरोप करणं सोपे असते आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरे जायचे नाही हे शूरपणाचे लक्षण नाही,असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी किरीट सोमय्या यांना लगावला.

आज जनता दरबारात आले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थान हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवले होते तरी सुद्धा दुर्लक्ष झाले. जास्तीचा बंदोबस्त ठेवायला हवा होता तेवढा ठेवला गेला नाही त्यामुळे संबंधित डीसीपीची बदली करण्यात आली आहे तर गावदेवी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला निलंबित केलेले आहे.अधिक चौकशी सुरू आहे. चौकशीत जे जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करु असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.किरीट सोमय्या सध्या नॉटरिचेबल आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले असता तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत असे केंद्राला विचारू असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.सदावर्ते प्रकरणाविषयी रितसर चौकशी सुरू आहे. जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती न्यायालयात देत आहेत त्यामुळे चौकशीचा भाग काय आहे आणि नाही यापेक्षा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना उघड करणे योग्य नाही असेही वळसे पाटील म्हणाले.

Previous articleकोळसा टंचाई : राज्यातील शहरी व ग्रामीण भागात आगामी काळात अधिकचे भारनियमन
Next articleझेडपी,खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय