किरीट सोमय्यांनी यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते भाजपमध्ये कसे काय ? राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले कृपाशंकर सिंग, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते हे भाजपात आहेत याचा अर्थ काय समजायचा असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.

आज काल किरीट सोमय्या यांनी उठसूठ मविआच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर आरोप करण्याची मालिका सुरू केली आहे. लोकशाहीमध्ये पारदर्शक कारभार केला पाहिजे आणि करतच आहे असे सांगतानाच ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले ते सर्व नेते आज भाजपात आहेत असेही तपासे यांनी स्पष्ट केले.छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणी आरोप केले होते मात्र त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे हेही लक्षात घ्या असेही महेश तपासे म्हणाले.आरोप करायचे करा. तुमचं काम आरोप करायचे आहे. आमचं काम महाराष्ट्राची सेवा करायचं आहे. महाविकास आघाडी सरकार मजबूत असून २०२४ चा कार्यकाल पूर्ण करेल आणि भविष्यातही निवडून येईल असा विश्वासही तपासे यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleशिवसेनेचे काहीही होऊ दे,पण हे सरकार ५ वर्ष टिकलं पाहिजे; राऊतांचा एकतर्फी कार्यक्रम
Next articleराज्यसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होणार ? काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल