अरविंद सावंत गड राखणार !

अरविंद सावंत गड राखणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई : उच्चभ्रू ,मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरीक अशी सरमिसळ असणारा दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून यंदा शिवसेना आपला गड राखणार  की मिलिंद देवरा बाजी मारणार हे २३ मे रोजी स्पष्ट होणार असलेले तरी येथिल अल्पसंख्यांक समाजातील मतदारांनी कोणाच्या  पारड्यात मते टाकली यावर येथिल निकाल अवलंबून असला तरी या मतदारसंघाचा कानोसा घेतला असता येथून शिवसेनेचा उमेदवार बाजी मारू शकतो अशी चर्चा आहे.

शिवडी आणि बीडीडी चाळीचा रखडलेला पुनर्विकास, कोस्टल रोडसह आदी प्रकल्पावरून मतदारांशी सामना करताना शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना प्रचारादरम्यान कसरत करावी लागत होती. २०१४ साली झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये हा मतदारसंघ शिवडीपर्यंत गेल्याने शिवसेनेची ताकद मोठ्या  वाढली.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे  अरविंद सावंत विजयी झाले. मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा होती. त्यामुळे मराठी मतांसह अल्पसंख्यांक मतदारांनी कोणाच्या पारड्यात मते टाकली आहेत हे परवा म्हणजे २३ मे रोजी स्पष्ट होईल.

या मतदार संघात विधानसभा निहाय झालेले मतदान

मलबार हिल -५६ टक्के, भायखळा -५४ टक्के, शिवडी- ५२ टक्के,वरळी ५१ टक्के, मुंबादेवी-४८ टक्के, कुलाबा- ४५ टक्के

२०१४ ला मिळालेली मते

१ ) अरविंद सावंत -शिवसेना- ३७४६०९

२ ) मिलिंद देवरा – कॅांग्रेस – २४६०४५

 

Previous articleमनोज कोटक की संजय पाटील बाजी मारणार ?  
Next articleलोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण