खंडणी प्रकरण : कर नाही त्याला डर कशाला ? गिरीश महाजनांवर शिवसेनेचे बुमरँग

मुंबई नगरी टीम

मुंबई : खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.गुन्हा दाखल करणे हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे, असे म्हणत त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.यावरूनच शिवसेनेने भाजपला त्यांच्याच एका विधानाची आठवण करून दिली आहे.कर नाही त्याला डर कशाला? असे म्हणत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे.

गिरीश महाजन यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राजकीय वर्तुळात यावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत म्हटले की, ही पोलिसांची कारवाई आहे.गिरीश महाजन यांनी जर काही केले नाही.तसेच हा राजकीय षडयंत्राचा भाग असेल असे त्यांना वाटत असेल,तर त्यांनी घाबरून जाऊ नये ही पोलिसांची कारवाई असून त्याची चौकशी होणारच.कर नाही त्याला डर कशाला? हे आपल्याच नेत्यांचेच वाक्य महाजन यांनी लक्षात ठेवावे, असा खोचक टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

राज्यातील सत्ताधाऱ्यांवर एखादा गुन्हा दाखल झाला किंवा तपास यंत्रणेची कारवाई झाल्यास भाजप नेते त्यावर तोंडसुख घेताना दिसतात.नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर भाजप नेत्यांनी टीका टिप्पणी केली होती. काही केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत होते. त्यामुळे आता भाजप नेत्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने त्यांचाच डायलॉग त्यांना सुनावला आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप महाजन यांच्यावर करण्यात आला आहे.

Previous articleसर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा ‘हा’ नवा फॉर्म्युला विचाराधीन
Next articleमराठा आरक्षणावरून भाजप नेत्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल