विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांची विद्युत शुल्क माफी पाच वर्षांनी वाढवली

विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांची विद्युत शुल्क माफी पाच वर्षांनी वाढवली

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील विदर्भ व मराठवाडा या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागांचा विकास होण्यासाठी  या विभागातील औद्योगिक घटकांना देण्यात येणारी विद्युत शुल्क माफीची सवलत  पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला.

आज झालेल्या निर्णयानुसार विदर्भ, मराठवाड्यातील सर्व उद्योग घटकांना दिनांक १.४.२०१९ ते ३१.३.२०१४ पर्यंत म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीसाठी विद्युत शुल्क माफीची सवलत प्राप्त होणार आहे. या निर्णयामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर ६०० कोटी रुपयांचा भार अपेक्षित आहे. मात्र, या निर्णयामुळे या दोन्ही विभागातील उद्योग इतर ठिकाणच्या उद्योगांशी स्पर्धा करण्यास सक्षम होण्यास मदत होणार आहे. परिणामी या भागातील उद्योग वाढीसोबतच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

 

Previous articleराज्यात कृत्रिम पाऊस पाडणार
Next articleराज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी