धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे कडाडले

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे कडाडले

मुंबई नगरी टीम

मुंबई :  विधान परिषदेत आज १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार होता. त्याला बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नाहक गोंधळ घातला. सभागृह तहकूब करायला भाग पाडले. सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहे अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, या शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजला. धनगर आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी पुन्हा गदारोळ घातला.परिणामी सभापतींना सभागृह दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सत्ताधाऱ्यांची वर्तवणूक विधिमंडळाच्या प्रथेला लागलेला कलंक आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मुंडे म्हणाले की, विधिमंडळाच्या इतिहासात आज पाहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून एखाद्या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ नये यासाठी जाणीवपूर्वक गोंधळ घातला गेला. यातूनच सरकारची नियत कळते असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. धनगर आरक्षणाच्या मुद्दावरून गदारोळ झाल्याने सभागृह दोन वेळा तहकूब करण्यात आले आणि तिसऱ्यांदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Previous articleमराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना मोठा दिलासा
Next articleमराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवरील खटले तातडीने मागे घ्या