शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात ९ टक्क्यांहून १२ टक्के इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज वित्त विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जारी केल्याचे सांगून ते म्हणाले की, १ जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०१९ पासून रोखीने देण्यात येईल तर १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित केले जातील असेही ते म्हणाले.

Previous articleमालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत
Next articleराज ठाकरे सोनिया गांधी यांच्या भेटीत काय झाली चर्चा