विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेता मग १२ आमदारांचे निलंबन केव्हा मागे घेणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानसभा अध्यक्षांची निवड येत्या मंगळवारी करण्यात येणार आहे.यावरून आता विरोधकांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांचे रिक्त आहे.नुकताच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.असे असताना मग भाजपच्या निलंबित केलेल्या बारा आमदारांचे निलंबन मागे केव्हा घेणार ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून,विरोधकांनी आज भाजपच्या निलंबित १२ आमदारांचामुद्दा आज सभागृहात उपस्थित केला.या कामकाजात भाजपच्या निलंबित १२ आमदाराच्या मुद्यावर विधनसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी निवेदन केले.झिरवाळ यांनी निवेदन केल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्ष पदाच्या निवडीच्या कार्यक्रमावरून संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधत या प्रकरणी मंत्री अनिल परब यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा दिला.हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होत असल्याचे बाहेरून समजते.परंतु याची माहिती सभागहातून नाही तर बाहेरून समजते.भाजपचे १२ आमदार निलंबित असताना त्यांचा कसलाही विचार न करता अध्यक्षांची निवडणूक घेतली जात आहे असे सांगून,अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची असेल तर अगोदर आमच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्या अशी मागणी मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.

मुनगंटीवार यांच्या या मागणी नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही १२ निलंबित आमदारांचा मुद्दा लावून धरत या आमदारांचे निलंबन केव्हा मागे घेणार असा सवाल केला.मुनगंटीवार हे सभागृहाचे अनुभवी सदस्य आहेत.विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम हा विधानसभेत केला जातो.सध्या विधानसभेचे कामकाज सुरू असल्याने अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.जेव्हा अध्यक्ष निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा त्याची घोषणा केली जाईल असे स्पष्ट करतानाच हे मुनगंटीवार यांना माहित नाही का ? असा सवाल परब यांनी केला.

Previous articleमंत्री आदित्य ठाकरेंना ठार मारण्याची धमकी ; एसआयटी मार्फत चौकशी
Next articleशौर्य दिन,विजयस्तंभ व परिसराचा विकास करण्यासंदर्भात धनंजय मुंडेंनी केली मोठी घोषणा