लक्ष्मीनगरचा एकात्मिक विकास आराखडा करणार

लक्ष्मीनगरचा एकात्मिक विकास आराखडा करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : “कांदिवली पूर्व येथील लक्ष्मीनगरमध्ये सुविधांची वानवा आहे. येथे सर्वांगीण एकात्मिक विकास आराखडा बनवून स्वच्छ परिसर निर्माण करू,” असा विश्वास भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्ष्मी नगर येथील संपर्क अभियान दरम्यान व्यक्त केला.

लक्ष्मीनगरातील नागरिकांशी संवाद साधत असताना, ‘कचऱ्याचे ढीग साठणे, प्रवाही ड्रेनेज लाईन नसणे, गटारांची दुरावस्था, तसेच दुर्गंधी मोठ्याप्रमाणात निर्माण झाली असून रोगराई सुद्धा मोठ्याप्रमाणात होऊ शकते,’ असे उपस्थित रहिवाशांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. या विषयवार बोलताना, ‘ही समस्यां केवळ एका चाळीपुरती किंवा गटारापुरती संबंधित असून संपूर्ण लक्ष्मीनगरसाठी एकात्मिक विकास योजना झाली तरच लक्ष्मीनगर स्वच्छ व सुंदर होईल. त्यासाठी महापालिकेचे संबंधित अधिकारी व इथल्या प्रमुख नागरिकांची एक बैठक आयोजित करू,’ असे यावेळी आ. दरेकर यांनी सांगितले.

“बेरोजगारी निर्मूलन व महिला स्वयंरोजगाराच्या अनेक योजना असून त्याही इथल्या गरीब व गरजूंकरिता राबविणार आहे. तसेच मुस्लिम समाजातील युवक व महिलांसाठी आणि बचतगटांसाठी असणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असेही त्यांनी यावेळी केले. ‘वंचित व अल्पसंख्याक समाजासाठीही भाजपा सरकार मोठ्याप्रमाणावर काम करीत असून सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हा,’ असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.या संपर्क अभियानमध्ये मौलाना आझाद महामंडळाचे – अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) अहमद राणा, राकेश चवाथे ,रहीस शेख , हुजुर खान , कौसर खान , अहमद राणा , आसिफ पठाण , अनिस शेख , फारुख शेख, युसुफ सय्यद  उपस्थित होते.

Previous articleम्हाडातील अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार आता गृहनिर्माण मंत्र्यांकडे
Next articleभाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे मुंबईत जोरदार स्वागत