हि स्वबळाची तयारी नाही : चंद्रकांत पाटील
मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करीत आहेत.अशा नेत्यांचा भाजपा प्रवेश म्हणजे भाजपाची हि स्वबळाची तयारी नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यश्र चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात प्रवेश करीत आहे तर येत्या बुधवारी गरवारे येथे होणा-या एका कार्यक्रमात विविध पक्षांचे मोठे नेते भाजपात प्रवेश करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले असून,दुस-या पक्षातील नेत्यांचा भाजप प्रवेश म्हणजे हि स्वबळाची तयारी नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आज केले आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केकेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण केले. उद्या १० वाजता या रथाला हिरवा झेंडा दाखवून दाखविला जाणार आहे. येत्या १ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महा जनादेश यात्रेची मोझरी मधून सुरूवात होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.ईडी किंवा इतर कोणती भिती दाखवून नव्हे तर गेल्या पाच वर्षातील सरकारचे काम पाहून आणि स्वत: चे राजकिय भविष्य पाहूनच काही नेते भाजपात प्रवेश करीत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
येत्या बुधवारी विविध पक्षांतील बडे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावला. आपल्या घरातील मुले आपल्याला सांभाळता आली पाहिजे ते दुस-या घरात का जातात त्यांचे आत्मपरिक्षण करायला पाहिजे असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.गेल्या पाच वर्षात राज्य कारभार करताना सर्व पक्षांतील आमदारांना विकास कामांसाठी निधीचे वाटप करण्यात आले असे सांगतानाच त्यांचा आमच्यावर विश्वास असून, आम्ही वाटून खाणारे नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. भाजपा हा कर्तृत्वाला वाव देणार पक्ष आहे असे ते म्हणाले.