शरद पवार धनंजय मुंडे उद्या  पुरग्रस्त सांगली सातारा भागात

शरद पवार धनंजय मुंडे उद्या  पुरग्रस्त सांगली सातारा भागात

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार हे उद्या शनिवारी १० ऑगस्ट रोजी पुरग्रस्त सांगली, सातारा जिल्ह्यात जाणार असून, या दौर्‍यात ते पुरग्रस्त भागांना भेटी देवुन तेथील नागरिकांना ही भेटणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ही त्यांच्या समवेत असणार आहेत.

सकाळी ९ वाजता ते तांबवे ता.फलटण, जि.सातारा येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता पलुस, ता.जि.सांगली येथील पुरग्रस्त भागाची पाहाणी व नागरिकांच्या भेटी घेवुन त्यांना दिलासा देणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ते सांगली येथील पुरग्रस्त व कॅम्पला  ही भेट देणार आहेत.

Previous articleकाँग्रेसचे आमदार खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार
Next articleपूरग्रस्त कोल्हापुरात बंदी आदेश म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच