फडणवीस सरकार हाय हाय…

फडणवीस सरकार हाय हाय…

मुंबई नगरी टीम

मुंबई : होश मे आओ होशमे आओ फडणवीस सरकार होशमे आओ… महिलाओंके सम्मानमे राष्ट्रवादी मैदानमे… बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो…फाशी द्या फाशी द्या बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या…फडणवीस सरकार हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसने मुंबई दणाणून सोडली.

राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईमध्ये राष्ट्रवादीने काढलेल्या सरकार विरोधातील मोर्चामध्ये मुंबईकर सर्वसामान्य जनताही सहभागी झालेली पाहावयास मिळाली. चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं नाही झालं तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच जोपर्यंत त्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत मुलीच्या भावासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेतली.यावेळी पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण पुरवण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना निवेदन सादर केले.

Previous articleविरोधकांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही
Next article१५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक !