नरेंद्र मोदींच्या महासभेने महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यानंतर येत्या १३ सप्टेंबर ते गुरूवार १९ सप्टेंबर या कालावधीत महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होईल,यानिमित्ताने विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपा मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या व दुस-या टप्प्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आता महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा येत्या १३ सप्टेंबर ते गुरूवार १९ सप्टेंबर या कालावधीत होत आहे .आधीच्या दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील २४ जिल्ह्यातील १०६ विधानसभा मतदारसंघातून २ हजार २०८ कि. मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होईल,यानिमित्ताने विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपा मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून प्रारंभ होईल. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १ हजार ५२८ कि. मी. प्रवास करणार आहे. गुरूवार १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.