शरद पवार राज्याचा दौरा करणार

शरद पवार राज्याचा दौरा करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार पडत असतानाच सध्या सुरू असणारी गळती थोपविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून,ते येत्या १७ सप्टेंबरपासून निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून होणार आहे.

येत्या १७ ते २२ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यामध्ये सभा ऐवजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेणार आहेत.१७ सप्टेंबरपासून सोलापुर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा याठिकाणी बैठका घेणार आहेत.शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप- सेनेच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा करत आहेत.पवार यांच्या या दौ-यात कुठेही सभांचे आयोजन करण्यात आले नसून, सध्या सुरू असणारी गळती थोपविण्याचा प्रयत्न ते या दौ-याच्या माध्यामासुन करतील अशी चर्चा आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपात
Next articleआमदार प्रवीण दरेकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश