नारायण राणेंना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही…..
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही तर ते आमचेच खासदार असून, भाजपाच्या कोटयातून ते खासदार झाले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.
मुंबई मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरील प्रमाणे उत्तर दिले.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही. तर ते आमचेच खासदार असून, भाजपाच्या कोटयातून ते खासदार झाले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राणे हे भाजपात येण्यास उत्सुक असलेले तरी शिवसेनेचा विरोध लपून राहिला नाही.
एका जमान्यामध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी लोकांच्या मागे जावे लागायचे. मात्र तो काळ आता संपला आहे असून, आम्ही जिथे जातो तिथे लोक स्वत: येतात. पक्षात प्रवेश करण्यासाठी लोक आता स्वत: भाजपाचे झेंडे घेऊन येतात. सोबत फोटो काढतात असे मुख्यमंत्री म्हणाले.ताकत कितीही असली तरी पक्ष विस्तार चालू राहिला पाहिजे. सगळयांनाच भाजपामध्ये यायचे आहे पण आम्ही ठराविक लोकांनाच प्रवेश देत आहोत असेही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जो सध्या कारभार चालू आहे. त्यावरून त्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना पुढचे २० ते २५ वर्ष स्वत:चे भविष्य दिसत असा टोलाही त्यांनी लगावला.