पहिल्या यादीत खडसे, बावनकुळे, तावडेंना स्थान नाही
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर पश्चिममधून तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना स्थान न मिळाल्यामुळे अनेक चर्चांना उधान आले आहे. आजच्या यादीत माजी एकनाथ खडसे, विद्यमान मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे प्रकाश मेहता या नेत्यांचा समावेश नाही.
आज जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार भाजपाने १२ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील १२५ उमेदवारांच्या यादीत माजी मंत्री एकनाथ खडसे,विद्यमान मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांची नावे नाहीत. या नेत्यांची नावे तूर्त जाहीर झाली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांनाही उमेदवारी देण्यात आली नाही.