मी मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नाही : शरद पवार
मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने या भेटीकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कसलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करतानाच शिवसेनेशी सोबत आमची कसलीही चर्चा झाली नसून, त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला नसल्याने आपण पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री बनण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना या भेटीची माहिती दिली.या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती त्यांना दिली. यावेळी ए.के. अंथोनी उपस्थित होते.राज्यातील स्थितीचा आढावा यावेळी सोनिया गांधींना दिला.काही गोष्टींवर सहकार्यांशी चर्चा करणार असून, उद्या पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.आजच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कसलीही चर्चा झाली नाही. मात्र भविष्यात काय घडेल हे आता सांगू शकत नाही असेही पवार यावेळी म्हणाले.राज्यात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी ही शिवसेना भाजपाची आहे. आम्हाला राज्यातील जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे.पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेशी कसलीही चर्चा झाली नाही आणु त्यांनी आम्हाला कसलाही प्रस्ताव दिलेला नसल्याने शिवसेनेला पाटिंबा देण्याच प्रश्न येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या चर्चेला पुर्ण विराम दिला.