सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी ९ जानेवारीला मतदान
मुंबई नगरी टीम
मुंबई : बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी ९ जानेवारीला मतदान; तर १० जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे.
नामनिर्देशनपत्रे १६ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत दाखल करता येतील. २२ डिसेंबर २०१९ रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. २४ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २६ डिसेंबर पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना २७ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. ९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १० जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: नाशिक- २२अ आणि २६अ, मालेगाव- १२ ड, नागपूर- १२ड, लातूर- ११अ, पनवेल- १९ब आणि बृहन्मुंबई- १४१.