तर राज्यात अराजकता निर्माण होईल : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम
मुंबई : हिंगणघाट जळीत कांडातील पिडितेचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुखद, धक्कादायक आणि मनसुन्न करणारी घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेन खाली गेली आहे. आम्ही पिडितेच्या कुंटूंबियांच्या दुखात सहभागी आहोत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे.अश्या घटना रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल आहे.जर हे सरकार महिलांच्या विरोधात घडणा-या दुदैर्वी घटनांना रोखण्यात सक्षम नसेल तर राज्यात अराजकता निर्माण होईल. अशी संतप्त प्रतिक्रिया म‍हाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.

या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी समाजाच्या प्रत्येक स्तरातून होताना दिसत आहे. पनवेल, मीरारोड, जळगाव, सिल्लोड याठीकाणी झालेल्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. या घटने नंतर जनता रस्त्यावर उतरली आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. महिलांवर सातत्यांने होणाऱ्या या घटनांमुळे हे सिध्द झाले आहे कि परिस्थिती या सरकारच्या हाता बाहेर गेली आहे. लोकांनी कायदा हातात घेतला आहे. जर हे सरकार महिलांच्या विरोधात होणाऱ्या घटनांना रोखण्यात सक्षम नसेल तर अराजकता निर्माण होईल. अशी भीतीही दरेकर यांनी व्यक्त केली.

Previous articleहिंगणघाट खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
Next articleधनंजय मुंडेंच्या जनता दरबाराचा दुसरा दिवसही हाऊसफुल्ल!