गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून वीर जवानाच्या कुटूंबाला आर्थिक सहाय्य

मुंबई नगरी टीम
मुंबई : परळी तालुक्यातील लाडझरी येथील वीर जवान महेश तिडके यांच्या कुटूंबियांस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने मदतीच्या हात दिला आहे, प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा धनादेश आज प्रज्ञाताई मुंडे यांच्या हस्ते जवानाच्या कुटूंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. वरळीतील कार्यालय सुरू झाले, त्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी जवानाच्या कुटूंबियांची काळजी घेत पहिली स्वाक्षरी मदतीच्या धनादेशावर करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

गेल्या महिन्यात भटिंडा (पंजाब) येथे झालेल्या एका अपघातात लाडझरी येथील जवान महेश तिडके गंभीर जखमी झाले होते, लष्करी रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या होत्या, तसेच कुटूंबियांची भेट घेतली होती. १२ फेब्रुवारी रोजी वरळीचे कार्यालय सुरू झाले त्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी सदर जवानांच्या कुटूंबियांस आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेऊन मदतीच्या धनादेशावर पहिली स्वाक्षरी केली. आज यशःश्री निवासस्थानी प्रज्ञाताई मुंडे यांच्या हस्ते वीर जवान महेश तिडके यांची आई छायाबाई आणि वडील यशवंत तिडके यांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आर्थिक सहाय्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

Previous articleदलित,आदिवासी,मागासवर्गीयांना विरोध भाजपच्या डीएनएमध्येच
Next articleराज्यसभेच्या ७ तर ; विधानपरिषदेच्या २२ जागा होणार रिक्त