परळीतील गुंडगिरीवरुन पंकजाताई मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

मुंबई नगरी टीम
मुंबई :परळीत गुंडागर्दी,हफ्तेखोरी,माफिया राज करायचे आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव असल्याची टीका माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी करीत बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

परळी शहरात काल दुपारी भरदिवसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमर देशमुख या व्यापाऱ्यास काठी आणि रॉडने बेदम मारहाण करण्यात आली.मारहाण करणारा आरोपी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे.या मारहाणीच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक देण्यात आली होती.याप्रकरणी पालकमंत्र्यांनी दिलेल्या हास्यास्पद स्पष्टीकरणाचा पंकजाताई मुंडे यांनी समाचार घेत यावर ट्विट करून संताप व्यक्त केला आहे.

परळीत गुंडागर्दी,हफ्तेखोरी,माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव आहे.हे खपवून घेतलं जाणार नाही.शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली आहे.त्याचा सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे.अशी टिका पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

Previous articleभीमा कोरेगाव प्रकरणी पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला त्याची चौकशी व्हावी : शरद पवार
Next articleराज्यात लवकरच आंध्रच्या धर्तीवर “दिशा” कायदा लागू होणार!