माथाडी कामगारांच्या पैशाचा अपहार करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई

मुंबई नगरी टीम
मुंबई : मुंबई, नवी मुंबई ठाणे येथील माथाडी कामगारांच्या ९० कोटी रुपयांच्या निधीचा अपहार करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केली.

मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथील माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या ३ हजार कामगार मंडळांच्या व्यवस्थापनाने केलेल्या ९० कोटी रुपयांच्या अपहाराचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थीत करण्यात आला होता. त्या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी ही संगठीत गुन्हेगारीची घटना असून २२ जणांना अटक करण्यात आली आहे, ६ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली ती गृहमंत्र्यांनी मान्य केली.

Previous articleमहाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका
Next articleधनगर समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन