गोंडवाना विद्यापीठात नवीन सात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

मुंबई नगरी टीम
मुंबई : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत या हेतूने गोंडवाना विद्यापीठात नवीन सात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास आज मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.ज्यामध्ये संगणक, भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र या विषयातील एम.एस्सी अभ्यासक्रम तसेच मराठी, अप्लाइड अर्थशास्त्र, मास कम्यूनिकेशन विषयातील एम.ए अभ्यासक्रम आणि एम.बी.ए अभ्यासक्रमाचा समावेश आहे.तसेच विविध विषयांच्या २१ प्राध्यापकांच्या पदांना मंजुरू देण्यात आलेली आहे. यासाठी ४ कोटी २७ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.असेही सामंत यांनी संगितले.

आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या प्रकल्पाच्या नवीन कर्ज प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी ६४३.५० कोटी रूपयांचा निधीस आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती सामंत यांनी दिली.या प्रकल्पाचा कालावधी पाच वर्षाचा आहे. या प्रकल्पांतर्गत माहीम, उत्तर तारकर्ली, दक्षिण तारकर्ली, देवबाग, काशीद, गणपतीपुळे, भाट्ये, मरीन ड्राइव्ह आदि क्षेत्रातील होलीस्टिक डिडेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे,रिवर बॅक आणि सॅण्ड स्पीट प्रोटेक्शन ड्युन संवर्धन, किनारा संवर्धन, रिफ बांधकाम, किनारा संवर्धन व्यवस्थापन ही कामे करण्यात येतील.असे ही सामंत यांनी संगितले.

Previous articleनागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मंत्री समिती गठीत
Next articleठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात “विकासाचा वर्षाव”