मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करणा-या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या चौकशीसाठी बोलावणे पाठवले आहे असून, येत्या येत्या ४ एप्रिलला शरद पवार हे आयोगासमोर साक्ष देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथील दंगल ही सुनियोजित होती ही आमच्या पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे.त्यामुळे यापूर्वीच शरद पवार यांनी आपल्या लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून म्हणणे मांडले आहे.शिवाय चौकशी आयोगाने पवार यांच्याकडे वेळ मागितली होती.त्यानुसार येत्या ४ एप्रिलला शरद पवार हे आयोगासमोर येऊन साक्ष देतील अशी माहिती मंत्री नवाब मलिक पत्रकार यांनी दिली.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी आयोगाने साक्ष देण्यासाठी बोलावले होते आले परंतु त्यांनी चौकशी आयोगाला सहकार्य केलेले नाही.लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून तसे कळवलेही नाही असेही मलिक म्हणाले.
चौकशी आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला कळेलच असे सांगतानाच संसदेचे अधिवेशन असल्याने शरद पवार हे येत्या ४ एप्रिलला चौकशी आयोगासमोर जाणार आहेत.राज्य चौकशी आयोगाची मुदत ८ तारखेला संपणार असली तरी इतर आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल असेही मलिक यांनी स्पष्ट केले.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात या आयोगाची सुनावणी होणार होती.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याऐवजी आता मुंबईत येत्या 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान आयोगाच्या सुनावणीचे कामकाज चालणार आहे.